नाशिक: पाठलाग करत सराफी व्यावसायिकाला मा’र’हा’ण
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरासह परिसरात लुटमारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. सातपूरच्या श्रमिकनगर परिसरातील गंगासागरनगरात शनिवारी (दि. ४) रात्री साडेनऊच्या सुमारास सराफी दुकान बंद करून दुचाकीने घरी निघालेल्या सराफी व्यावसायिकाचा पाठलाग करत चार संशयितांनी त्याला अडवत बे’द’म मा’र’हा’ण केली.
त्यांच्या हातातील कागदपत्रांची बॅग हिसकावली. प्रतिकार करताच कोयता व धारदार शस्त्रांनी वार करत पलायन केले. या ह’ल्ल्या’त ज’ख’मी झालेले सराफी व्यावसायिक महेश टाक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी लूट आणि ज’ब’री मा’र’हा’णी’चा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पो’लि’सां’नी दिलेली माहिती व सराफ व्यावसायिक महेश टाक (रा. निवृत्ती अपार्टमेंट, वृंदावन गार्डन, श्रमिकनगर) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे स्वामी हाईट्स बिल्डिंग येथे श्री यमाई माता ज्वेलर्स हे दुकान आहे. शनिवारी रात्री ९.३०च्या सुमारास सुमारास दुकान बंद करून ते दुचाकीने घरी निघाले असता दोन जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. श्रमिकनगरमधील नाल्याजवळ आधीच दोन जण त्यांची वाट पाहत उभे होते. नाल्याजवळील अंधाऱ्या भागात संशयितांनी महेश यांना आडवे होत त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
त्यास महेश यांनी प्रतिकार करताच को’य’ता व धा’र’दा’र श’स्त्रां’नी वा’र करण्यात आले. यात महेश हे जखमी झाले. ह’ल्ल्या’त जखमी झालेल्या महेश यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखळ करण्यात आला असून वरीष्ठ निरीक्षक किशोर मोरे अधिक तपास करीत आहे.