कॉलेज सुरु करण्यासंदर्भात उच्च शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

कॉलेज सुरु करण्यासंदर्भात उच्च शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कॉलेज आणि शाळा  संपूर्णपणे बंद आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शाळा आणि कॉलेजेस बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन सुरु आहे. मात्र आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कॉलेज सुरु करण्याबाबत  एक महत्त्वाची घोषणा केली आहे. बारावीनंतरच्या प्रवेशाबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात कालपासून अनलॉकचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणूनच आता येतं शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये बोलवण्यात येणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्यामुळे कोविडची स्थिती बघून पुढचं शैक्षणिक वर्ष फिजीकली सुरू करणार अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. हे शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु होणार आणि कॉलेजेस पुन्हा कधीपासून सुरु होणार याबद्दलचा निर्णय येत्या 8 दिवसात घेणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू होताना निकष वेगळे असतील असंही त्यांनी म्हंटलं आहे.

बारावीनंतर प्रवेशासाठी महत्वाच्या घोषणा:
बारावीनंतर पुढील उच्च शिक्षणासाठी साधारणतः CET म्हणजेच प्रवेश परीक्षा द्यावी लागते. मात्र यंदा कोरोना असल्यामुळे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार नाही आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना बारावीच्या मार्कांवरच कॉमर्स, सायन्स आणि आर्टस्मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासंबंधीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. दरवर्षीच्या बारावीच्या निकालापेक्षा यंदा बारावीचा निकाल तब्बल नऊ टक्के जास्त लागला आहे त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कॉलेजमध्ये तुकड्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
या ठिकाणी मिळतेय किराणा मालावर घसघशीत सूट !
नाशिक शहरातील पाणीकपातीबाबत महापालिकेचा महत्वाचा निर्णय…
आता राज्यात किराणा दुकानं आणि सुपर मार्केट्समध्येही मिळणार वाइन; येणार नवं धोरण!

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790