आज (दि. ३ ऑगस्ट) बारावीचा रिझल्ट; किती वाजता आणि कसा बघायचा.. जाणून घ्या

आज (दि. ३ ऑगस्ट) बारावीचा रिझल्ट; किती वाजता आणि कसा बघायचा.. जाणून घ्या

नाशिक (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावीचा (SSC)चा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासूनच बारावीचा निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. आता पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे यामुळे दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालालाही यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा झाला आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकषही ठरवले होते. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारेच आज बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

बोर्डाच्या खालील अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच बारावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.

बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील:
www.maharesult.nic.in, www.maharesult.nic.in, msbshse.co.in, hscresult.11thadmission.org.in, hscresult.mkcl.org, आणि mahresult.nic.in .

दरम्यान, बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी 30 :30 :40 असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा आणि इतर निर्बंधांबाबत अतिशय महत्वाची बातमी…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790