नाशिक: भाईला सोडवण्यासाठी कोयता लावून खंडणी मागणाऱ्या दोघा भाईंना २४ तासांत अटक !

नाशिक: भाईला सोडवण्यासाठी कोयता लावून खंडणी मागणाऱ्या दोघा भाईंना २४ तासांत अटक !

नाशिक (प्रतिनिधी): कारागृहात असलेल्या भाईला सोडवण्यासाठी सराईत गुन्हेगार कोयत्याने खंडणीची मागणी केली. महिलेला धमकी देत बळजबरीने घरात घुसून तिच्या पतीचे रिक्षातून अपहरण करत पैशांची मागणी करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मखमलाबादगाव येथे उघडकीस आला होता. याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी संशयिताना २४ तासांत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दि. 19/07/2021 रोजी फिर्यादी माधव कारभारी वाघ (वय 32 वर्षे, रा. सिडको, नाशिक) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात येउन तक्रार दिली की, दि. 19/07/2021 रोजी रात्री 09.00 वा. च्या सुमारास ते त्यांच्या मित्राला सोडुन दिपाली नगर, नारायणी हॉस्पीटलजवळुन त्यांच्या मोटार सायकलने राहत्या घरी जात होते. तेव्हा अचानक चार अनोळखी इसमांनी त्यांना अडविले. त्यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हते. त्या चार इसमांपैकी एकाने वाघ यांना धारदार कोयता लावुन गप्प बसण्यास सांगितले, त्यानंतर त्यांचेकडील 1 मोबाईल, रोख रक्कम व कानातील बाळी असे एकुण 16,000/- रू. चा ऐवज जबरदस्तीने काढुन घेतला. तसेच फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार केली तर त्यांचा काटा काढु म्हणुन धमकी दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

त्यानंतर फिर्यादी यांनी मात्र त्यांच्या धमकीस बळी न पडता मुंबई नाका पोलीस ठाण्यात येवुन समक्ष तक्रार दिली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या बाजुला असलेल्या भारत नगर झोपडपट्टीमधुन फिर्यादीने वर्णन केल्याप्रमाणे हुबेहुब दिसणारे इसम सलमान युसुफ अत्तार (वय 20 वर्षे) व मोईन सलीम पठाण (वय 20 वर्षे), दोन्ही रा. भारत नगर, नाशिक यांना संषयावरून ताब्यात घेवुन चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणले.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

त्यांना फिर्यादी यांचेसमक्ष दाखविण्यात आल्यानंतर वाघ यांनी त्यांना समक्ष ओळखले. त्यानंतर संशयित आरोपींकडे कसुन तपास करण्यात आला असता, त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनतर त्यांचेकडुन गुन्ह्यात चोरलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हृयाचा पुढील तपास सपोनि के. टी. रोंदळे करीत असुन आरोपींना दि. 25/07/2021 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, पोलीस उप आयुक्त  अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या  मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक के. टी. रोंदळे, पोलिस हवालदार रोहिदास सोनार, पोलिस नाईक सोमनाथ डोंगरे, पोलिस नाईक भरत डंबाळे, पोलीस शिपाई युवराज गायकवाड, पोलीस शिपाई आप्पासाहेब पानवळ, पोलीस शिपाई योगेष पवार, पोलीस शिपाई अनिल आव्हाड यांनी केली.
या Bluetooth Headphone ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे… तब्बल दोन लाख लोकांनी आतापर्यंत खरेदी केला हा Bluetooth Headphone.. तुम्ही खरेदी केला का ?

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here