जादा परताव्याचे आमिष देत महिलेला ७ लाखांचा ऑनलाइन गंडा
नाशिक (प्रतिनिधी): कमी वेळेत जादा लाभांश देण्याचे आमिष देत महिलेला ७ लाख ५० हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि शम्मी शेट्टी (रा. मोटवानी रोड) यांच्या तक्रारीनुसार,मोबाइलवर टेक्स मेसेजवर संपर्क साधून अॅप डाऊनलोड करण्यास सांगत तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेवर कमी वेळेत अधिक परतावा देऊ असे सांगीतले.
शेट्टी यांनी सुरुवातीला या मेजेसकडे दुर्लक्ष केले. मात्र संशयितांनी वारंवार गळ घातल्याने शेट्टी यांचा त्यावर विश्वास बसल्याने त्यांनी होकार दिला. संशयितांनी विविध बँकेचा युपीआय आयडी देत विविध बँक खात्यात वेळोवेळी ७ लाख ५० हजार भरण्यास सांगीतले. वारंवार होणाऱ्या पैशांची मागणीमुळे शेट्टी यांना संशय आला. त्यांनी भरलेले पैसे परत मागीतले असता संशयितांनी संपर्क तोडत मोबाइल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयितांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.