१८ ते ४४ वयोगटातील नागरीकांसाठी नाशिक मनपा खरेदी करुन देणार लस !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दि.१३ मे २३ या दरम्यान कडक लॉकडाउन जाहीर केलेला असतांना आज मितीस ९०० ते १००० पेशंट आढळुन येत आहे. कडक लॉकडाऊन असतांना ही परिस्थिती आहे तर लॉकडाऊन ओपन झाल्यास काय होईल असा प्रश्न महापौर यांनी उपस्थित केला आहे. शहरात  कामानिमित्त व व्यवसाया निमित्त बाहेर पडणारा वर्ग हा वय वर्षे १८ ते ४४ पर्यंतचा असुन त्यांच्या सुरक्षितते साठी त्यांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे.

आज मितीस नाशिकची परिस्थिती दुस-या लाटेमध्ये भयंकर झालेली असतांना तिस-या लाटेत परिस्थिती काय होऊ शकते याचा विचार डोळयासमोर ठेऊन लसीकरणाचा निर्णय घेण्यासाठी व -नाशिक शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने मनपाने लस खरेदी करण्याबाबत महापौर सतीश नाना कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांचेसह मनपा पदाधिकारी यांची बैठक झाली मनपास लवकरात लवकर लस उपलब्ध होणार असल्यास त्वरित लस खरेदीचा निर्णय घेण्यात येईल असा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील आयुक्त दालनाच्या शेजारील सभागृहात लस खरेदी करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव,उपमहापौर भिकुबाई बागुल,स्थायी समिती सभापती गणेश गीते,सभागृहनेते सतीश सोनवणे,विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते,गटनेते जगदीश पाटील,विलास शिंदे,शाहू खैरे,गजानन शेलार,नंदिनी बोडके,दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते. नाशिक शहरातील लोकसंख्येचा विचार करता १८ ते ४४ या वयोगटातील सुमारे पाच लक्ष नागरिकांचे लसीकरण करावे लागणार असून त्यादृष्टीने या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

या अनुषंगाने सध्या शासनाकडून लस उपलब्धता अल्प प्रमाणात होत असून शहरातील या वयोगटातील लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लस खरेदी करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली.शासनाकडून ऑगस्टपासून लस उपलब्ध होईल असा साधारणता अंदाज असून तत्पूर्वी महापालिकेस लस उपलब्ध होत असल्यास ती खरेदी करणे योग्य होईल.तसेच ती लस खरेदी करताना स्वतंत्र ग्लोबल टेंडर न काढता मुंबई,पुणे ठाणे या महापालिकांनी जे ग्लोबल टेंडर काढले आहे त्यांचे दरांचा आढावा घेऊन  त्यांच्याकडून या लस प्राप्त करून घेणे सोयीस्कर होईल त्यासाठी त्या महापालिकांचे दर व लस किती दिवसात उपलब्ध होईल याची सविस्तर माहिती घेण्यासाठी व चर्चा करणेसाठी आयुक्त यांना महापौर व उपस्थित सर्व पदाधिकारी व गटनेते यांनी त्या अनुषंगाने लस खरेदीचा निर्णय घेण्याची चर्चा या बैठकीत झाली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

तसेच नाशिक मनपासाठी किती लस खरेदी करावी याबाबत स्वतंत्र आढावा बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत सध्या सुरू असलेले लसीकरण, रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्धता, घरोघरी जाऊन लसीकरणाची व्यवस्था करणे, मनपास लवकरात लवकर लस उपलब्ध झाल्यास खाजगी कंपन्या, दवाखाने यांना लस उपलब्ध करून देणे त्यामुळे लसीकरण केंद्रावर होत असणारी गर्दी टाळता येणे शक्य होईल अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here