ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे नाशिक जिल्ह्याला किती ऑक्सिजन मिळाला.. जाणून घ्या..

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी विशाखापट्टणम् येथून आज ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’च्या माध्यमातून दोन टँकरच्या द्वारे 27.826 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा मेडिकल ऑक्सिजन नियंत्रण कक्षाचे समन्वयक दत्तप्रसाद नडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार,  विशाखापट्टणम् येथून ऑक्सिजन एक्सप्रेस द्वारे नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे चार टँकर्स उतरविण्यात आले आहेत. यापैकी दोन टँकर्स नाशिक व दोन टँकर्स अहमदनगर जिल्ह्यासाठी आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी एकूण 27.826 मेट्रिक टन आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी 24.736 मेट्रिक टन असे एकूण 52.560 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचे चार टँकर्स प्राप्त झाले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

नाशिक जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या 27.826 मेट्रिक टन ऑक्सिजनपैकी चार मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा धुळे जिल्ह्यास देण्यात येणार आहे. यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी 23.820 मेट्रिक टन इतका साठा शिल्लक राहणार असल्याचेही, अप्पर जिल्हाधिकारी नडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790