नाशिक (प्रतिनिधी): कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजन आणि प्राणवायू मिळवताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभुमीवर आता देशातील आर्मी राखीव हॉस्पिटलमध्ये विशेष कोविड वॉर्ड निर्मिती करण्याचा निर्णय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आहे. देशभरा ज्या पाच आर्मी हॉस्पिटलमध्ये कोविड वॉर्ड सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यात नाशिकचा समावेश करण्यात आला आहे. तसे आदेश डिफेन्स सेक्रेटरी यांना देण्यात आले आहेत.
संरक्षणमंत्र्यांच्या आदेशानूसार देशातील फक्त आर्मी राखीव हॉस्पिटलमध्ये विशेष कोविड वॉर्ड निर्मिती करण्यात येणार आहे. यात सर्वसामान्य नागरिकांवरही उपचार होतील. लखनौ, पटना, अहमदाबाद, नाशिक यासह देशातील काही शहरात हे हॉस्पिटल्स आहेत. नाशिक हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून शासनाच्या वतीने करण्यात येणा-या सुविधा अपुर्या पडत आहे, बेड, ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.
यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारच्यावतीने देशातील मिलिटरीच्या राखीव हॉस्पिटल मध्ये विशेष कोविड वॉर्डची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत. देशातील लखनौ, पटना, अहमदाबाद व नाशिक यासह देशातील काही शहरात अशा प्रकारचे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नाशिक मधील बाधित रुग्णांची उपचारासाठी होणारी धावपळ कमी होण्यास काहीअंशी मदत होणार आहे.