महत्वाची बातमी: किराणा दुकानांच्या वेळेत पुन्हा बदल.. राज्यस्तरीय निर्णय..!

किराणा दुकानांच्या वेळेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे…

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात लॉकडाऊन कडक करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील किराणा दुकानं मर्यादित वेळे पुरतेच खुली ठेवता येणार आहेत. सकाळी 7 ते 11 या वेळेत किराणा दुकानं सुरू राहतील असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

याआधी घाऊक दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत तर किरकोळ व्यापारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवणार असल्याचा निर्णय नाशिक शहरातील विविध व्यापारी संघटनांनी घेतला होता. मात्र आता सकाळी 7 ते 11 हा राज्य स्तरावर घेतलेला निर्णय यापुढे लागू राहील…

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

या बैठकीत ऑक्सिजनच्या मागणीवरही चर्चा झाली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

याशिवाय पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790