नाशिक शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांची आता अँटिजेन टेस्ट सुरु करण्यात आली आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीसुद्धा काही लोक विनाकारण रस्त्यांवर फिरत आहे. त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी अशा लोकांना पकडून त्यांची अँटिजेन टेस्ट करायला सुरुवात केली आहे.
मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीत चांडक सर्कल व भरत नगर चौफुली या नाकाबंदी ठिकाणी रस्त्यावरून विनाकारण फिरणारे 31 इसमांची मनपा लॅब टेक्निशियन मंगेश कुवर व विलास गणते यांचे मदतीने कोविड टेस्ट करण्यात आली त्यामध्ये 1 इसम पॉझिटिव्ह आला. त्याला समाज कल्याण कोविड सेन्टर येथे नेऊन दाखल करण्यात आले.
पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील रामकुंड परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती, फुले नगर, हिरावाडी रोड ,काटे मारुती चौक ,मालेगाव स्टँड या नाकाबंदी पॉईंट या ठिकाणी कोवीड मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 39 लोकांची टेस्ट मनपाचे वैद्यकीय पथकाचे मदतीने करण्यात आली यात सर्वजण निगेटिव्ह आले. तसेच म्हसरूळ व आडगाव कडील एकूण 11 लोकांची देखील तपासणी करण्यात आली असता त्यापैकी दोन पॉझिटिव्ह आले, त्यांना मेरी कोवीड केअर सेंटर येथे उपचारासाठी लगेच दाखल करण्यात आले. सदरची मोहीम यापुढे देखील दररोज चालू राहणार आहे, असे नाशिक पोलिसांनी सांगितले आहे.
भद्राकाली हद्दीत त्रंबक नाका, गुमशाबाबा दर्गा, व सारडा सर्कल येथे नाकाबंदी सुरु होती. त्यापैकी सारडा सर्कल एकूण 47 लोकांची अँटीजेन्ट टेस्ट करण्यात आलेली आहे त्यातही 2 जण पॉझिटिव्ह आढळून आले.