नाशिक (प्रतिनिधी): बँकांचे कामकाज बुधवारी (दि. ३१) ग्राहकांसाठी सुरू असले तरी उद्या १ एप्रिलला बँकांमध्ये अंतर्गत इयर एण्डचे कामकाज चालणार असल्याने ग्राहकांसाठी बँका बंद असतील, २ एप्रिलला गुड फ्रायडेची सुटी असल्याने सलग दोन दिवस बँका ग्राहकांसाठी बंद राहतील.
४ एप्रिलला रविवार असल्याने बँकांना सुटी असेल. शनिवार, ३ एप्रिलला मात्र बँकांचे नियमित कामकाज सुरू राहील. सलग तीन किंवा चार दिवस बँकांना सुट्ट्या नसल्याने एटीएममध्ये रक्कम नसल्यासारखी अडचण ग्राहकांना जाणवणार नसली तरी लॉककडाऊनच्या चर्चेमुळे तसेच इयर एण्डच्या कामासाठी लोक बँकेत गर्दी करत असले तरी सर्वच बँकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग, मर्यादित संख्येने प्रवेश, तापमान तपासणी, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर गेला जात आहे.
मार्च एण्डपर्यंत बँकेची महत्त्वाची कामे आटोपण्यासह पुन्हा शहरात लॉकडाऊन लागतो की काय, या भीतीने बँकांच्या शाखांसमोर लोक गर्दी होत आहे. मंगळवारी एका प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकेच्या नाशिकरोड शाखेतील सहा कर्मचारी पॉझिटिव्ह आले. मात्र कामकाज बंद करता येत नसल्याची अडचणही कर्मचाऱ्यांना येत आहे.