खासगी रुग्णालयांनी बेडची माहिती लपवली तर कारवाई – मनपा आयुक्त

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना, त्यांच्यावर सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी राखीव केलेले बेड बुक असल्याचे सांगत २० टक्के राखीव खाटांवर रुग्णांवर उपचार करण्याच्या प्रकाराची गंभीर दखल आयुक्त कैलास जाधव यांनी घेतली आहे.

खासगी रुग्णालयातील ८० टक्के सवलतीच्या दरात उपचार करणारे बेड कोणते याची माहिती तसेच दरपत्रक भिंतीवर लावण्याचे आदेश त्यांनी दिले असून, खास अभियंत्यांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत अचानक तपासणी करून घेतली जाणार आहे. यात अनियमितता अाढळल्यास संबंधित रुग्णालयाला जागेवर नोटीस देऊन कारवाई केली जाणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण ७ फेब्रुवारीनंतर झपाट्याने वाढत चालले आहे. दिवसाला सरासरी हजार रुग्ण आढळत असून गेल्या काही दिवसांत हाच आकडा बाराशे ते पंधराशेच्या घरात गेला आहे. घरगुती अलगीकरणाचे पालन होत नसल्यामुळे तसेच काही रुग्णांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.

त्यातच वाढती रुग्णसंख्या बघता पुन्हा एकदा संक्रमण वाढले असून त्यामुळे भीतीपोटी रुग्ण खासगी रुग्णालयाचा रस्ता धरत आहेत. मात्र, काही रुग्णालय सवलतीच्या दरात उपचार करण्याचे सोडून २० टक्के नियमित दराने उपचार करणाऱ्या खाटांवर रुग्णांना दाखल करून घेत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

त्यामुळे रुग्णांचा अकारण खिसा खाली होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे बघून आयुक्त जाधव यांनी पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम आणि नगररचना विभागातील अभियंत्यांवर खातरजमा करण्याची जबाबदारी दिली आहे.

पालिकेच्या सहा विभागांत स्वतंत्र पथके केली असून ते आपल्या क्षेत्रातील कोरोना रुग्णालयांची तपासणी करतील. याबाबत आयुक्त जाधव म्हणाले की रोज सकाळी दहा वाजता कोरोना रुग्णसंख्या, उपलब्ध बेड, उपचाराबाबत अडचणी याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतो. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होऊ नये यासाठी माझे स्वत:चे बारीक लक्ष आहे. अवास्तव बिल आकारणी होऊ नये यासाठी अभियंत्यांना तपासणीचे अधिकार दिले आहेत तर लेखापरीक्षक रुग्णालयात राहून शासननियमानुसार बिल घेत आहे का याची तपासणी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790