जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
23 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने सटाणा येथील केरसाणे गावावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त झाल्याचे चित्र आहे, आर्थिक आणि आसमानी संकटांना आता ह्या हवालदिल शेतकऱ्याला तोंड द्यावे लागतेय…
नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपलेय,त्यामुळे शेतकरीराजा हा मोठ्या चिंतेत सापडलाय,नाशिकच्या सटाणा तालुक्यातील केरसाणे ह्या संपूर्ण गावाला अवकाळी पावसासोबतच मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली,गारपीट इतकी होती की अक्षरशः गारांचा खच च्या खच सगळीकडे साचलेला दिसून येत होता.
अनेकांची शेती ह्या गारपिटीने उद्धवस्त झाल्याचे चित्र सगळीकडे दिसून येतंय. अनेक ठिकाणच्या शेतात हातातोंडाशी आलेले कांदा पीक डोळ्या समोर उध्वस्त झाल्याचे चित्र केसराने गाव आणि त्या आजूबाजूच्या परिसरात आहे. शेतात देखील पिकांच्या जागी गारांचा ढीग साचलेला दिसून येत होता.
त्यामुळे शेतकरी राजाला निसर्गाने पुन्हा एकदा पाठ दाखवून संकटाच्या दारी आणून ठेवलेय.. डोळ्या समोर उद्धवस्त झालेले पीक ,आणि त्यासाठीची अन्नदात्याची अनेक महिन्यांची मेहनत आता मात्र वाया गेली आहे…त्यामुळे एकूणच “अवकाळी पावसामुळे, उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्याला अपेक्षा आहे ती, सरकारच्या मदतीची”…!