पतीला ठार मारण्याची धमकी देत बलात्कार

नाशिक (प्रतिनिधी): पतीला मारून टाकण्याची धमकी देत एकाने विवाहितेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर येथील संशयित पॉली शांतवन जाधव (वय ३०) यास अटक केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

पोलिसांच्या माहितीनुसार, तुझ्या पतीला मारून टाकील अशी धमकी संशयिताने पीडितेला दिली. त्याने जानेवारी २०१९ ते २० मार्च २०२१ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील सार्वजनिक शौचालयाजवळील पडीक खोलीत मारहाण करत वारंवार बलात्कार केला. त्यातून पीडित महिला दीड महिन्याची गर्भवती राहिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गायकवाड करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790