पंचवटी एक्सप्रेसच्या एका बोगीला आग.. अनर्थ टळला !

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी एक्सप्रेसच्या एका बोगीच्या अपलिंक भागाला आग लागल्याची घटना समोर आली आहे,प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना होता होता वाचली आहे..

पंचवटी एकक्सप्रेसच्या B-11 बोगीला चाकांच्या जवळ खालच्या बाजूला आग लागण्याने एकच धावपळ उडाली होती,प्रवाशांच्या हा प्रकार लक्षात येताच चैन ओढत रेल्वे थांबवून प्रवाशांनी बोगीतून उड्या घेतल्या.तर अन्य काही प्रवाशांना इतरांच्या साहाय्याने तात्काळ बाहेर काढण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याचे महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन

त्यामुळे पुढील अनर्थ होताहोता टळला आहे. आहे.सुदैवाने ही बाब प्रवाशांच्या लक्षात आली होती.सकाळच्या सुमारास कल्याणजवळील असलेल्या उंबरमाळी स्टेशनच्या नजीक ही घटना घडली आहे. प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे पुढे होणारी रेल्वे दुर्घटना टळल्याने सर्वांनी एकच सुटकेचा निःश्वास घेतला आहे..!

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790