नाशिक शहरात नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळावे म्हणून आता नाशिक शहर पोलीसही मैदानात उतरले आहेत.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही अनेक नागरिक या नियमांचे उल्लंघन करत आहेत.
गेल्या २-३ दिवसांपासून नागरिकांनी नियम पाळावेत यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय स्वत: नागरिकांचे प्रबोधन करत आहे. शिवाय जे नागरिक नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे.
शुक्रवारी सिडकोतील त्रिमूर्ती चौक, दिव्या एडलॅब, पवननगर, उत्तमनगर येथे कारवाई करण्यात आली. यावेळी ज्यांनी मास्क घातले नव्हते त्यांना पोलीस वाहनात बसवून रॅपिड अॅन्टीजन टेस्ट कामी कोविड केअर सेंटरला दाखल केले आहे.
या कारवाईत पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते
दरम्यान नाशिकचे नागरिक अशाच पद्धतीने जर नियम मोडत गेले तर कठोर निर्बंध लावावे लागतील असा इशारा गुरुवारी (दि. १० मार्च) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.