पोलिस ठाण्याच्या हद्दीत धंदे सुरू असल्यास पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिला आहे.
नाशिक (प्रतिनिधी): शहरात अवैध धंद्यांवर कारवाई सुरू असून गुरुवारी (दि. १८) परिमंडळ १ मधील ६ पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईत मटका, जुगार आणि इतर अवैध धंदे चालक आणि खेळणाऱ्या ६० संशयितांना अटक करण्यात आली. ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ १ मधील भद्रकाली, पंचवटी, गंगापूर, म्हसरूळ, आडगाव, मुंबई नाका या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुगार मटका अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईने शहरात धंदे सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे. वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ यांच्या पथकाने उपायुक्त संजय बारकुंड, सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
पोलिस ठाण्याच्या हद्दीत धंदे सुरू असल्यास पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिला आहे. या कारवाईने पोलिस ठाण्याच्या प्रभारींमध्ये खळबळ उडाली आहे.