नाशिक (प्रतिनिधी) : मनपाचे गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे मिटरींग क्युबिकल केबलची जोडणी करुन टेस्टिंग करणेची आवश्यकता आहे. कामासाठी दि. २०/०२/२०२१ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वा. पावेतो महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडीत ठेवावा लागणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथील रॉ वॉटर पंपींग होणार नाही.
त्यामुळे नाशिक शहरातील दि. २०/०२/२०२१ रोजीचा दूपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा खालील विभागांमध्ये संपूर्णपणे बंद राहील.
पंचवटी विभाग, नाशिकरोड विभाग, सातपूर विभाग व नाशिक पश्चिम विभाग
तसेच खालील विभागातील नमुद भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहील.
नवीन नाशिक विभाग : प्र.क्र. २४, २५, २६ व २८ येथील उंटवाडी जगताप नगर, कालिका पार्क, इंद्रनगरी, कामटवाडे परिसर, पवननगर, आयटीआय पूल, शिवशक्ती चौक, शाहू नगर, खुटवड नगर, बंदावणे नगर, साळूंखे नगर, महालक्ष्मी नगर, डीजीपी क्र. २, मुरारी नगर, वावरे नगर, अंबड माऊली लॉन्स परिसर इ.
नाशिक पूर्व विभाग: वडाळा गांव, गावठाण परिसर, वडाळा रोड, जे. एम. सिटी कॉलेज, जयदीप नगर, साईनाथ नगर, विनयनगर परिसर, द्वारका व काठे गल्ली, जयशंकर नगर, टाकळी रोड परिसर, उपनगर पगारे मळा, प्र.क्र. २३ मधील अशोका मार्ग, हिरे नगर, टागोर नगर, डीजीपी नगर व गांधनीगर जलकुंभ १, २, ३ व ४ प्र.क्र. १६ मधील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, शिवाजीनगर परिसर, उत्तरा न गर, बोधलेनगर, गायत्रीनगर, अयोध्यानगर, प्र.क्र. २३ मधील डीजीपी नगर (भागश: कल्पतरुनगर, हॅपी होम कॉलनी, व बजरंगवाडी इ. भागातील गुरुवार दि. २०/०२/२०२१ रोजी दूपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.
तसेच दि. २१/०२/२०२१ रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.