नाशिकमध्ये सोमवारी किमान ९.२ इतक्या किमान तापमानाची नोंद..

नाशिक (प्रतिनिधी): उत्तर भारतात सध्या बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिकमध्ये सोमवारी (दि.८ फेब्रुवारी) ९.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतात पुढील ४ दिवस पश्चिमी प्रकोपामुळे पाऊस, बर्फवृष्टी, गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढेही पार २ ते ४ अंशाने घसरण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खंडणीसाठी केलेल्या मारहाण प्रकरणातील दोघांना अटक

यंदा पश्चिमी चाक्र्वाताची संख्या सुमारे २५ पेक्षा अधिक झाल्याने थंडीमध्ये चढउतार होत आहेत. त्यामुळेच नाशिक शहरातही गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790