म्हसरूळ: महिला खून प्रकरणी संशयित आरोपीला अटक !

नाशिक (प्रतिनिधी): दोन दिवसांपूर्वी मखमलाबादराेडकडे जाणाऱ्या पवार मळा येथील कच्चा रस्त्यालगत असलेल्या नाल्याजवळ २० जानेवारी रोजी रात्री एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता..ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती..

पोलिसांनी तपासला गती देत दोन ते तीन दिवसांत आरोपीला गजाआड केले आहे.. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी म्हसरूळ पोलिसांनी पोलीस आयुक्तालय आणि शहरातील सर्व पोलिस स्टेशनला कळविले होते.. पंचवटी पोलीस ठाणे येथे खून झालेल्या महिलेच्या वर्णनाशी मिळतीजुळती महिला मिसींग असल्याची तक्रार देण्यासाठी मोरेमळा येथे राहणारे विनोद पंढरीनाथ आखाडे हे आले त्यांनी मयत महिला ही पत्नी पूजा विनोद आखाडे असून ती गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत  पंचवटी पोलिसांच्या पथकाने  घटनास्थळापासुनच जवळ सुरू असलेल्या अर्णन सृष्टी रो हाउस, या बांधकाम साईट येथे असलेल्या राखणदारास याबाबत तपास केला असता, काळया रंगाच्या रिक्षात एक संशयित आणि महिला जोरजोरात भांडण करत होते तर थोड्यावेळा नंतर सदर रिक्षा त्या ठिकाणाहून जोरात निघुन गेल्याची माहिती दिली.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

त्यानुसार गुन्हे शोध पथकाने संशयिताच्या शोध सुरू करत, मृत पूजा आखाडे हिच्या घरी जावुन तपास केला असता तिचा 4 वर्षाचा मुलगा साई विनोद आखाडे याने आई पूजा ही सागर भास्कर बरोबर रिक्षाने जात असल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी सागरचा शोध घेत, संशयित आदेश उर्फ सागर दिलीप भास्कर ह्याला मखमलाबाद रोड येथून ताब्यात घेन्यात आले.दरम्यान सागर ह्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. खुनातील आरोपी सागर भास्करवर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे आहेत…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790