शहरात गायब झालेल्या थंडीचे पुनरागमन !

नाशिक (प्रतिनिधी) : बऱ्याच दिवसांपासून गायब झालेली थंडी परतली असून, नाशिककरांना हुडहुडी भरणार आहे. त्यानुसार, गुरुवारी राज्यभरातून नाशिकमध्ये सर्वाधिक कमी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मंगळवारी (दि.१९ जानेवारी) रोजी १५.२ अंश सेल्सिअस इतके असलेले किमान तापमान गुरुवारी मात्र, ११.४ अंशावर स्थिर होते. त्यामुळे तापमान कमी होऊन थंडी वाढली आहे. तसेच अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पाऊस पडून वातावरणात दमटपणा निर्माण झाला होता. याचा देखील अनुभव नाशिककरांनी घेतला. मात्र, आता शीतलहरींचा प्रभाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली असून, थंडी जाणवायला लागली आहे. अनेक वेळा राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली आहे. मात्र, गुरुवारी  तापमानात घसरण झाल्याने पुन्हा एकदा नाशिक राज्यात सर्वात थंड शहर ठरले आहे. दरम्यान, तापमानात घसरण झालेली असली तरी, दुपारी मोठ्या प्रमाणावर उकाडा होतो.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790