नाशिकच्या ‘या’ विविध भागांतील वीजपुरवठा रविवारी (दि. २२) बंद राहणार…

नाशिक। दि. २१ नोव्हेंबर २०२६: महावितरणच्या पंचक, मुक्तिधाम व देवळाली कॅम्प उच्चदाब वाहिनी तसेच ३३ के.व्ही. सिक्युरिटी प्रेस विद्युत वाहिनीच्या तातडीचे देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पंचक, मुक्तिधाम व देवळाली कॅम्प विद्युत उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे जेल रोड, कैलासजी सोसायटी, भीम नगर, ब्रह्मगिरी सोसायटी, साने गुरुजी नगर, कलानगर, आशा नगर, गंधर्व नगरी, लोकमान्य नगर, मोटवानी रोड तसेच परिसरातील वीजपुरवठा खंडित राहणार आहे. यासह मुक्तिधाम व देवळाली उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता रोबोटिक सर्जरीची सुविधा; अपोलो हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक युनिट सुरू

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे: महापारेषणच्या सातपूर १३२ केव्ही विद्युत उपकेंद्रातून निर्गमित होणाऱ्या वाहिनीवर असलेल्या ३३ केव्ही बेळगाव ढगा आणि खंबाळे या दोन विद्युत उपकेंद्राचा संपूर्ण वीज पुरवठा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या विविध विद्युत कामासाठी रविवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घेवून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी मतदारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्र भरून देण्याचे आवाहन

यामध्ये खालील परिसरातील वीज पुरवठा प्रभावित राहील:
यामध्ये बेळगाव ढगा गाव, संस्कृती हॉटेल, महिरावणी ते त्र्यंबकेश्वर महामार्ग, वासाली गाव व परिसर, जे.के. पावडर व मॉन्टेक्स फायबर ग्लास, पिंपळगाव बहुला गाव व परिसर, जाधव संकुल, केवल पार्क, म्हाडा परिसर, संदीप युनिव्हर्सिटी, महिरावणी गाव व परिसर, पिंपळगाव गरुडेश्वर, खंबाळे गाव, तळेगावअंजनेरी, जातेगाव, तळेगाव, ग्रेप काउंटी, मुळेगाव, दहेगाव, शिवणगाव, गणेशगावनाईक,गणेशगाव त्र्यंबक, पिंपळगाव बहुला या भागाचा समावेश असणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून

सदर काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790