Amazon

नाशिक: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 9.91 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

नाशिक, दि. ५ नोव्हेंबर २०२६ : म्हसरूळ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकून तब्बल ९ लाख ९१ हजार १२० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बाजारपेठेतील गर्दीमुळे सिटीलिंक बसच्या 'या' मार्गांत बदल

अन्न सुरक्षा अधिकारी संकेत प्रदीप येलमामे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने म्हसरूळमधील वडजे मळा, शालिनी नारायणनगर येथील सर्व्हे क्रमांक ११३/१/४ मधील जागेवर ही कारवाई केली. महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची साठवणूक, वाहतूक तसेच विक्री करण्यास कायद्याने बंदी असतानाही संबंधित ठिकाणी या प्रतिबंधित पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आल्याचे तपासणीत आढळले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोकसहभागातून जलसंधारणाला बळ; १८ गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी

कारवाईदरम्यान विविध प्रतिबंधित ब्रँडचा माल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख ९१ हजार १२० रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या प्रकरणी प्रवीणकुमार नामदेव धुमाळ (वय ४२, रा. पवननगर) यांच्याविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी संकेत येलमामे यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790