Amazon

नाशिक: दिवाळीनिमित्त शहरातील ‘या’ महत्वाच्या वाहतूक मार्गांत ९ दिवस महत्वाचे बदल; खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या…

नाशिक। दि. २ नोव्हेंबर २०२६: नाशिक शहरातील सरकारवाडा व भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती बाजारपेठा मेनरोड, रविवार कारंजा, शालीमार, सांगली बँक परिसरामध्ये दिपावली सणाचे खरेदी-विक्री निमित्ताने मोठयाप्रमाणात नागरीक व त्यांचे वाहनांची गर्दी होत असते.

त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील मार्गावर वाहतुकिची कोंडी होवु नये म्हणुन नागरीकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करून सदर वाहतुक मार्गात बदल करणे आवश्यक आहे.

यासाठी महत्वाच्या मार्गांवरील वाहतुकीत ३ नोव्हेंबर २०२६ ते ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रत्येक दिवशी सकाळी १० ते रात्री १० पावेतो म्हणजेच ०९ दिवस महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे:

🔎 हे वाचलं का?:  अरगोंडापासून अधिक निरोगी भारताकडे: अपोलोच्या टोटल हेल्थ मॉडेलने ग्रामीण आरोग्यसेवा जीवनात कसे परिवर्तन घडवू शकते, हे दाखवून दिले

🚫 प्रवेश बंद मार्ग:
👉 मालेगांव स्टॅण्ड ते रविवार कारंजा कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेश बंद.
👉 दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
👉 रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर भद्रकाली कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
👉 बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
👉 नेपाळी कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-मेनरोड-धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
👉 सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
👉 रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; १३ नोव्हेंबरनंतर तापमानात मोठी घसरण होण्याचा अंदाज

⤴️ पर्यायी मार्ग:
👉 मालेगांव स्टॅण्ड-मखमलाबाद नाका-रामवाडी-बायजाबाई छावणी-चोपडा लॉन्स-गंगापुर नाका मार्गे इतरत्र जातील व येतील.
👉 पंचवटी कडुन मेन मार्केटकडे येणारी वाहने संतोष टी पॉईंट, व्दारका मार्गे इतरत्र जातील व येतील.
👉 जुने नाशिक परिसरात जाण्या व येण्यासाठी सीबीएस- शालीमार – खडकाळी सिग्नल – सारडा सर्कल या मार्गाचा वापर करतील. किंवा
👉 वाहनचालकांनी गर्दीची ठिकाणे सोडुन इतर तत्सम पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

🅿️ पार्किंग व्यवस्था (वाहनतळ):
बी.डी. भालेकर मैदान शालीमार, रविवार कारंजा, गोदाघाट तसेच गाडगे महाराज पुलाखाली, स्मार्ट सिटीच्या मार्किंग केलेल्या पार्किंग. खरेदीसाठी मुख्य बाजारपेठांमध्ये येणारे वाहनचालकांनी आपली वाहने वर नमुद पार्किंगचे ठिकाणी पार्क करावी.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप; मृताच्या आई-वडिलांना एक लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश

वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेकरीता असलेली वाहने, अग्निशमन दलाची वाहने, शववाहिका, रुग्णवाहिका, तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना लागु राहणार नाहीत.

सदरील अधिसुचना दि.०३/११/२०२६ पासुन अंमलात येणार असुन दि.०३/११/२०२६ ते दि.११/११/२०२६ पावेतो प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते रात्री १०.०० पावेतो ०९ दिवस अंमलात राहिल. वर नमुद मार्गात व वेळेत परिस्थीतीनुसार ऐनवेळी कोणतीही पुर्वसुचना न देता बदल करण्याचे अधिकार राखुन ठेवण्यात आलेले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790