Amazon

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. ३०) नाशिकमध्ये भव्य नगरपरिक्रमा !

नाशिक। दि. ३० ऑक्टोबर २०२६ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये आज (शुक्रवारी) भव्य नगरपरिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ आणि सिंहस्थ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या नगरपरिक्रमेचा प्रारंभ दुपारी २ वाजता तपोवन येथून होणार आहे. तत्पूर्वी, कुंभमेळ्याचा मुख्य धर्मध्वज दुपारी १ वाजता श्री काळाराम मंदिरातून तपोवन मैदानावर आणण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  मालेगाव महापालिका आयुक्तांसह तिघांना अटक

तपोवनातून सुरू होणारी नगरपरिक्रमा सायंकाळी ७ वाजता रामकुंड येथे पोहोचेल. यावेळी गोदावरीच्या तीरावर भव्य महाआरती करण्यात येणार असून, त्यानंतर तब्बल एक लाख दिव्यांच्या प्रकाशात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक सनातन परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790