Amazon

नाशिक: भरधाव सिटीलिंक बसमधून पडून वाहक गंभीर जखमी

नाशिक। दि. २५ ऑक्टोबर २०२६: नाशिक शहरात सिटीलिंक बसच्या वेगाचा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विनयनगर येथील पंचमुखी हनुमान मंदिर चौकात शनिवारी (दि. २४) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास धावत्या सिटीलिंक बसमधून पडल्याने बसचा वाहक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मसाला कारखान्यावर FDA ची धडक कारवाई; २,२३० किलो मसाला जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, पंचमुखी हनुमान मंदिर चौकात गतिरोधक असतानाही बसचा वेग कमी करण्यात आला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. गतिरोधकावरून बस जात असताना बसला जोरदार धक्का बसला. याचवेळी दरवाजा उघडल्याने वाहक थेट रस्त्यावर पडला.

विशेष म्हणजे, वाहक बसमधून पडल्याचे चालकाच्या लक्षात न आल्याने बस पुढे गेली. त्यानंतर नागरिकांनी आरडाओरड करून चालकाचे लक्ष वेधल्यानंतर बस थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वाहकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 24 व 25 ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

शहरात सिटीलिंक बसच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची आणि गतिरोधकांसह संवेदनशील ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी या घटनेनंतर पुन्हा जोर धरू लागली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790