Amazon

त्र्यंबकेश्वर मंदिर ३१ ऑक्टोबरला खुले राहणार; दर्शनासाठी पास बंधनकारक

नाशिक। दि. २२ ऑक्टोबर २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी, म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. मात्र, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी पास पद्धत लागू करण्यात येणार असून, भाविकांसाठी तीन हजार पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यामुळे ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद राहणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी १३ कोटी ८४ लाखांचा कृती आराखडा

शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले असून, त्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव ३० आणि ३१ ऑक्टोबर असे दोन दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सेमीकंडक्टर व संरक्षण उद्योग क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर खुले राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, राष्ट्रपतींचा संभाव्य दौरा आणि ध्वजारोहण सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. यासाठी पासधारक भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असून, तीन हजार पास उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुशावर्त परिसरातील ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला अधिक गती द्यावी- आयुक्त शेखर सिंह

दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या ऐतिहासिक सोहळ्यात आदिवासी बांधवांचा सन्मानपूर्वक सहभाग सुनिश्चित करण्यासाठीही प्रशासनाकडून विशेष नियोजन केले जात आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी आदिवासी बांधवांकरिता काही पास राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

टीप : भाविकांनी दर्शनासाठी जाण्यापूर्वी पास वितरणाची ठिकाणे, वेळ आणि प्रवेशासंबंधीचे अधिकृत निर्देश तपासावेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790