नाशिक। दि. १२ ऑक्टोबर २०२६: सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर परिवहन महामंडळ (सिटीलिंक) चार मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करणार आहे. मार्ग क्रमांक २७७, १०६, १३० आणि १५२ या मार्गांवर नव्याने बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे.
सकाळी व रात्रीच्या वेळेत प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा उपलब्ध असेल. नागरिकांनी या नव्या बसफेऱ्यांचा लाभ घ्यावा आणि सार्वजनिक वाहतुकील प्राधान्य द्यावे, असे आवाहन परिवहन महामंडळाने केले आहे. या बससेवेमुळे विद्यार्थी, नोकरदार व दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
मार्ग क्रमांक २७७ : नाशिकरोड डेपो ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि विद्यापीठ ते नाशिकरोड डेपो या मार्गावर म्हसरूळ, इंदिरानगर, महामार्ग व वरवंडी परिसरातून धावणार आहे. सकाळी ८.३०, १०.१५, दुपारी ३.३५ आणि सायंकाळी ४.४० या वेळेत बस असेल.
मार्ग क्रमांक १०६ : तपोवन ते अमृतानगर आणि अमृतानगर ते तपोवन या मार्गावर सकाळी ७.४० आणि ८.४० वाजता बससेवा. कमोदनगर, वासननगर आणि पाथर्डी फाटा परिसरातील प्रवाशांना फायदा.
मार्ग क्रमांक १३०: तपोवन टर्मिनस ते भगूर या दिशेने सायंकाळी ६.१५ वाजता, तर भगूर ते तपोवन टर्मिनस या दिशेने सकाळी ६.४५ वाजता बसफेरी. लहवित कॅम्प, बिटको, महामार्ग, अशोका मार्ग व मुंबई नाका परिसर जोडला जाणार.
मार्ग क्रमांक १५२ : सीबीएस ते पिंपळगाव ही बस रात्री ८ वाजता, तर पिंपळगाव ते सीबीएस ही बस सकाळी ६.५० वाजता धावणार.
![]()


