Amazon

नाशिक: एफडीएच्या छाप्यात ११.३९ लाखांचा गुटखा जप्त, संशयिताला अटक

नाशिक। दि. १२ ऑक्टोबर २०२६: प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शिंदेगाव परिसरात कारवाई केली. या छाप्यात गुजरातमधून आणलेला ११ लाख ३९ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे आठ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण १९ लाख ३९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राज इलियास सैय्यद याला अटक करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: त्र्यंबकेश्वर, बेळगाव ढगा आणि खंबाळे भागातील वीज पुरवठा रविवारी (दि. ११) बंद राहणार

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) शिंदेगाव येथे छापा टाकला. यावेळी संशयित राज इलियास सैय्यद याच्याकडील मालाच्या बिलाबाबत अधिकाऱ्यांनी विचारणा केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर पथकाने गुटख्याच्या अवैध वाहतुकीप्रकरणी कारवाई केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जुन्या वादातून दोघांना मारहाण; सोन्याची चेन आणि रोकड लुटल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक

या कारवाईत ११ लाख ३९ हजार ६०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच, गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे आठ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहनही जप्त करण्यात आले. दोन्ही मिळून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १९ लाख ३९ हजार ६०० रुपये आहे.

अटकेतील संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक भड, सुहास मंडलिक, श्रद्धा राहिंज आणि वैभव गर्दै यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790