Amazon

भगूरला रेणुका देवी यात्रेनिमित्त वाहतूक मार्गामध्ये महत्वाचे बदल

नाशिक। दि. ११ ऑकटोबर २०२६: भगूर येथील रेणुका देवी मंदिर यात्रोत्सवानिमित्त नाशिक शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदलाची अधिसूचना जारी केली आहे. ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता रेस्ट कॅम्प रोड, केंद्रीय विद्यालय ते जोशी हॉस्पिटलपर्यंत सर्व प्रकारची वाहनांना दुपारी २ ते रात्री १२ पर्यंत प्रवेश बंद राहील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कालिका यात्रोत्सवानिमित्त शहरातील 'या' वाहतूक मार्गांत महत्वाचे बदल

पर्यायी मार्ग : १) भगूरकडून देवलाही कॅम्पकडे व देवळाली कॅम्पकडून भगूरकडे जाणाऱ्या एस.टी. बसेस, रिक्षा व इतर वाहने जोशी हॉस्पिटल-स्नेहनगर -पेरूमल मार्ग – टेम्पल हिल रोड जॉझिला मार्ग सेंट्रल स्कूल मार्गे जातील व त्याच मार्गाने येतील.

२) भगूरकडून देवलाही कॅम्पकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दुसरा मार्ग – भगूरनाका नं. २ येथून डावीकडे वळून मल्हारी बाबानगर- बार्न्स स्कूलरोड-शिगवे बहुला -धोंडीरोड – खंडेराव टेकडी – डेअरी फार्म आनंदरोड – संसरीनाका मार्गे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारण व पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य- मंत्री जयकुमार गोरे

३) देवलाली कॅम्पकडून भगूर गावाकडे जाणारी जड व अवजड वाहने -संसरी नाक्याकडून उजवीकडे वळून आनंदरोड-डेअरी फार्म-धोंडीरोड-शिगवे बहुला -बार्न्स स्कूल – भगूरनाका नं. २ मार्गे जातील.

बॅरिकेडिंग पॉईंट्स:
१) भगूरनाका नं. ०२, २) चंद्रमणी बसस्टॉप, ३) केंद्रीय विद्यालय भगूर, ४) सिलेक्शन कॉर्नर, ५) वर्कशॉप कॉर्नर, ६) संसरीनाका, ७) जोशी हॉस्पिटल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790