नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या पाच जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ चे पोलीस उपयुक्त अमोल तांबे यांनी ही कारवाई केली आहे.
सुमित सुधीर साळवे (वय २५, रा. खडकाळी, भद्रकाली, नाशिक), कल्पेश/सोन्या मनोज झगडे (वय २२, रा. भंडारीबाबा चौक, नवदुर्ग, कुंभारवाडा, जुने नाशिक), धनंजय शिवाजी मिसाळ (वय २९, रा. बजरंगनगर, आनंदवली, गंगापूर रोड, नाशिक), हेमंत राजेंद्र भदाणे (वय ३०, रा. शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी, गंगापूर, नाशिक), अवधूत सुनील जाधव (वय १९, रा. दत्तमंदिर, शिवशक्ती चौक, शनी मंदिराजवळ, सिडको, नाशिक) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.
सदर गुन्हेगार हे शरीराविरुद्धाचे व मालाविरुद्धाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने त्यांच्या गुन्हेगारीस प्रतिबंध लागावा यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.