नाशिक। दि. ६ सप्टेंबर २०२६: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव – शिरसोली-म्हसावद दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या पूर्वतयारीसाठी ७ सप्टेंबर रोजी पूर्व नॉन-इंटरलॉकिंग आणि ८ सप्टेंबरला नॉन-इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. ८ सप्टेंबरला सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत जळगाव-शिरसोली-म्हसावद दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर मेगा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
वेळ बदललेल्या गाड्या:
गाडी क्र. २६१०२ अजनी-पुणे वंदे भारत ८ सप्टेंबर रोजी अजनीहून निर्धारित वेळेपेक्षा उशिरा दु. १२:५० वा. रवाना होईल. (मूळ वेळ स. ९:५०)
गाडी क्रमांक १९००४ भुसावळ-दादर एक्सप्रेस भुसावळ येथून निर्धारित वेळेऐवजी सायं. १८:४० वा. रवाना होईल. (मूळ वेळ १७:४०)
मेमू पूर्णपणे रद्द:
गाडी क्र. ११११९/१११२० (इगतपुरी- भुसावळ-इगतपुरी मेमू), गाडी क्र. ११११३/११११४ (भुसावळ-देवळाली-भुसावळ मेमू) गाडी क्र. ६११२९/६११३० (नाशिक रोड-बडनेरा-नाशिक रोड)
थांबवून ठेवण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्या:
अमृत भारत एक्सप्रेस माहेजीला २ तास ५० मिनिटे थांबणार. बालिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भादलीला २ तास ४५ मि. थांबणार. अमृत भारत एक्सप्रेस भुसावळ स्थानकावर २ तास ३० मिनिटे. बेंगलोर-नई दिल्ली, एलटीटी-छपरा, मुंबई-पटना, हुबळी-ऋषिकेश, एलटीटी-जयनगर यांसह अन्य गाड्याही वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवणार.
![]()


