नाशिक: महिलेचे फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग? अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक। दि. ५ सप्टेंबर २०२६: रेल्वे स्थानकावर सोडण्याच्या बहाण्याने ओळखीच्या महिलेला घरी बोलावून शीतपेयातून गुंगीकारक औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार नाशिकरोड परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेचे फोटो आणि व्हिडिओ नातेवाईक तसेच समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये साकारत आहे 'गीत रामायण'चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजता रवींद्र रघुनाथ दळवी (रा. पारशीवाडी, कोपरी कॉलनी, ठाणे) याने रेल्वे स्थानकावर सोडण्याच्या कारणाचे सांगून महिलेला आपल्या फ्लॅटवर बोलावले. महिला तेथे पोहोचल्यानंतर संशयिताने तिला शीतपेयातून गुंगीकारक औषध दिल्याचा आरोप आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५४ परवाने निलंबित

यानंतर महिलेची असहाय्य अवस्था पाहून संशयिताने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हे फोटो-व्हिडिओ नातेवाईकांना तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत संशयिताने महिलेला विविध ठिकाणी नेले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबई-धुळे मार्गिका खुली, उर्वरित काम १५ ऑक्टोबरपर्यंत; द्वारका जंक्शनवरील वाहतुकीला दिलासा

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात रवींद्र दळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (नाशिकरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५२१/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790