नाशिक (प्रतिनिधी) : लॉक डाऊननंतर देशभरातील शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. अनलॉक टप्पा सुरु झाला असला तरी कोरोनाचा संसर्ग अजून काही थांबलेला नाहीये. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये सुरु करावीत की नाही? यावर प्रश्नचिन्हच आहे. मात्र देशातील कोरोनाबाधितांचे प्रमाण आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे म्हणून शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालये सुरु करण्यासाठीची SOP काढली आहे. त्यानुसार ५० टक्के विद्यार्थ्यांना टप्प्यानुसार प्रवेश देता येणार आहे. यासोबतच कोविडचा संसर्ग टाळण्यासाठीच्या शासनच्या सगळ्या नियमांचं पालन करणे बंधनकारक आहे. जसे की हात धुणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, निर्जंतुकीकरण करणे इत्यादी बाबींन लक्षात घेऊन मगच कॉलेज किवा शाळा सुरु करता येणार आहे.