नाशिक शहरातील ‘या’ भागांत मंगळवारी (दि. २५) वीजपुरवठा बंद राहणार !

नाशिक। दि. २४ ऑगस्ट २०२६: नाशिक शहरातील महावितरण च्या शहर विभाग १ अंतर्गत असलेल्या ३३/११केव्ही क्रीडा संकुल विद्युत उपकेंद्र येथे रोहित्र क्षमता वाढीचे तातडीच्या कामाकरीता साईनगर , एकदंत व अडगाव या ११ केव्ही वाहिन्यांवरील भागांचा वीजपुरवठा मंगळवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘शिक्षण उत्सव २०२६’मधून शिक्षकांच्या कार्याचा गौरव; संवाद, नवोपक्रम आणि सहकार्याला नवी दिशा

यामध्ये विद्युत वाहिनीनिहाय खालील भागांचा समावेश असणार आहे.
साई नगर वाहिनी अंतर्गत: शिवकृपा नगर, मांडलिक मळा, साई नगर, साई शिव नगर, अयोध्या नगरी, चक्रधर नगर, धात्रक फाटा, बलराज नगर, लोकमान्य हॉस्पिटल, सोनपापडी कारखाना, हरी ओम कपालेश्वर नगर, आशापुरा कॉलनी व आजूबाजूचा परिसर.

एकदंत नगर विद्युत वाहिनी अंतर्गत: बोडके नगर, त्र्यंबक नगर, शिवकृपा नगर, त्रिकोणी बंगला परिसर, कालिका नगर, कळसकर नगर, माने नगर, के. के. वाघ कॉलेज परिसर, शिक्षक कॉलनी, नारायण नगर, बळीराज कॉलनी, धात्रक फाटा, साई नगर, शुभम कॉलनी व आजूबाजूचा परिसर.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत उपाययोजना व उत्पन्नवाढीवर भर द्यावा- व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे

आडगाव विद्युत वाहिनी अंतर्गत: धात्रक फाटा, महालक्ष्मी नगर, राऊत माळ, शरयू पार्क, कदम मळा, महावीर नगर, मेडिकल कॉलेज, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, म्हसरूळ रोड, म्हाडा बिल्डिंग, कर्मयोगी नगर व परिसर याचा समावेश असेल.

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वा वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790