नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने शहरातील विविध भागात सुमारे २५ जलकुंभ उभारणीस व सिडकोच्या मिळकतींना पुनर्बांधणी शुल्क माफ करण्याच्या विषयाला मंजुरी दिली असल्याची माहिती स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी दिली.
नाशिक शहरातील पाणी प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने शहरातील विविध भागात २० ते २५ जलकुंभ उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे विविध भागात उदभवणारा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पाण्याच्या जलकुंभांची गुणवत्ता राखण्यासाठी प्रशासनाला विशेष पथक नेमण्याचे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनास दिलेले असून लवकरच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या जलकुंभाचे भूमिपूजन घेण्यात येणार आहे. या सर्व जलकुंभ उभारणीमुळे नाशिक शहरातील पाण्याचा प्रश्न पुर्णतः मार्गी लागणार असल्याचा विश्वास स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी व्यक्त केला.