नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

नाशिक। दि. १ ऑगस्ट २०२६: किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. घरात घुसून तोडफोड करणे, कुऱ्हाडीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच फिर्यादीच्या आई-बहिणीला शिवीगाळ केल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अंबड एमआयडीसीतील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; व्यावसायिकाचा मृत्यू

जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. डी. वडणे यांनी शुक्रवारी (दि. ३१ जुलै) हा निकाल दिला. आकाश कुर्णेकर (वय २२, रा. मिशनमळा, शरणपूर, नाशिक) असे दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती अभियोग कक्षाकडून देण्यात आली.

ही घटना २७ जुलै २०२० रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. फिर्यादी संदेश कांबळे यांचा भाऊ जखमी- संकेत कांबळे आणि आरोपीचा भाऊ यांच्यात झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून आरोपी आकाश कुर्णेकर याने कुऱ्हाड घेऊन फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्याची तोडफोड करत कुऱ्हाडीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीच्या आई व बहिणीला शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी

या प्रकरणातील पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच संबंधित कलमानुसार इतर शिक्षाही न्यायालयाने आदेशित केल्या असल्याची माहिती अभियोग पक्षाने दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790