नाशिक परिक्रमा मार्गासाठी वरवंडी येथील खरेदी प्रक्रिया पूर्ण- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि.९ जुलै २०२६: नाशिक शहरातील प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) यांच्या माध्यमातून सुरू असून, ही प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत मौजे वरवंडी (ता. दिंडोरी) येथील गट क्रमांक 97/2 मधील 0.21 हेक्टर आर क्षेत्राची थेट खरेदी प्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयात अमराठी ऑटोरिक्षासह टॅक्सी चालकांसाठी १० जुलै रोजी मराठी भाषा कार्यशाळा

मौजे वरवंडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर सिताराम जाधव, सरस्वती सिताराम जाधव, प्रकाश सिताराम जाधव, शरद सिताराम जाधव, मंदाकिनी बाळासाहेब ताजणपुरे, शुभम साहेबराव जाधव, मयुरी साहेबराव जाधव तसेच श्रीमती वंदना साहेबराव जाधव यांच्या एकत्रित कुटुंबाच्या मालकीच्या गट क्रमांक 97/2 मधील 0.21 हेक्टर जमिनीची खरेदी प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. सदर खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जाधव कुटुंबातील एकूण 19 सदस्य उपस्थित होते. संबंधित सर्व सदस्यांच्या संमतीने व सहकार्याने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदावरी नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने कार्यकारी अभियंता संदीप पांडागळे व अॅड. स्वप्नील मोरे यांनी ही खरेदी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.

शासनाच्या महत्त्वाकांक्षी परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनास सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाधव कुटुंबाचे अभिनंदन केले. शेतकरी व जमीनधारकांच्या सहकार्यामुळे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळत असून, सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उभारण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790