नाशिक: घरफोडीच्या गुन्ह्यात चार वर्षापासून फरार अटकेत

नाशिक। दि. ८ जुलै २०२६: गंगापूर पोलिस ठाण्यात २०२२ मध्ये दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात ४ वर्षापासून फरार संशयिताला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने द्वारका येथे ही कारवाई केली.

रोहित एकनाथ लाटे (रा. संत कबीरनगर) असे या संशयिताचे नाव आहे. पथकाचे प्रशांत मरकड यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार संशयित द्वारका येथे येणार आहे, अशी माहिती मिळाली. पथकाचे मिलिंदसिंग परदेशी, संदीप भांड, मुख्तार पठाण, यांच्या पथकाने सापळा रचला. संशयिताला पथक आल्याचे समजल्याने त्याने तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्याचा प्रयत्न हाणून पाडत ताब्यात घेतले.

Loading

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वर: साधूग्रामचे काम आतापासूनच सुनियोजित करण्याचे निर्देश
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790