नाशिक शहरात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणास महापौरांपासून झाली सुरूवात

नाशिक। दि. १ जून २०२६: भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादी विशेष सखोल परीक्षणास महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्यापासून आज सुरुवात झाली.

जिल्ह्यात मतदार विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत आजपासून गृह भेटीस सुरुवात झाली. त्यानुसार नाशिक शहराच्या प्रथम नागरिक, महापौर श्रीमती आडके यांचा प्रगणना अर्ज भरुन घेण्यात आला. यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी अमोल निकम, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सारिका आहेर आदी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १ जुलैला 'सुनेहरी रंगीन यादे' हिंदी सुमधुर गीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा

महापौर श्रीमती आहेर म्हणाल्या की, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित केली जाणार असल्याने नागरिकांनी अधिकारी व केंद्रस्तरीय मतदार अधिकाऱ्यांना (BLO) आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन पूर्ण सहकार्य करावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील ‘या’ भागांत बुधवारी (दि. १ जुलै) वीजपुरवठा बंद राहणार…

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अचूकपणे नोंदविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी प्रशासनाचे अधिकारी व बीएलओ नागरिकांच्या घरी भेट देऊन Enumeration Form भरून घेतील. नागरिकांनी या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक माहिती अचूकपणे उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790