नाशिक। दि. २ जानेवारी २०२५: शहर व परिसरात बुधवारी वाढलेला थंडीचा कडाका गुरुवारी (दि.१) सकाळी अचानकपणे कमी झाला. किमान तापमानाचा पारा ९.८ अंशांवरून आज (दि. २) थेट १२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. ढगाळ हवामानामुळे थंडीची तीव्रता सकाळी कमी जाणवली.
आज वातावरणात ९३ टक्क्यांपर्यंत आर्द्रता मोजली गेली आहे. तसेच काळ सायंकाळी कमाल तापमान २८.३ अंश सेल्सिअस इतके मोजण्यात आले.
नाशिकरांना गारवा जाणवत होता. यामुळे नव्या वर्षाचा पहिल्या दिवशी कडाका अधिक राहील, असे वाटत असताना गुरुवारी मात्र सकाळपासूनच ढगाळ हवामान शहरात पाहावयास मिळाले. दुपारी बारा वाजेपर्यंत शहरात आभाळ दाटून आलेले असल्याने थंडीची तीव्रता पूर्णतः कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना आला.
पुढील ४ दिवस थंडीत होणार वाढ:
उत्तर भारतामध्ये दाट धुके, थंडीची लाट आहे. परिणामी महाराष्ट्रातही गुरुवारी ढग जमा झाले. किमान तापमानातवाढ झाली. पुढील ४ दिवस ही स्थिती अशीच असल्याने सर्वसाधारण थंडी जाणवणार आहे.
कारण : हिमवृष्टी आणि उत्तर, पुर्वेकडील राज्यात दाट धुक्याने दृश्यमानता ही ५० ते ८० मीटर होती. थंडीची लाटही आहे. उत्तरेडील गार वाऱ्यांना अटकाव निर्माण झाल्याने महाराष्ट्रात थंडी काहीशी कमी झाली आहे.
![]()


