नाशिक। दि. २७ डिसेंबर २०२५: नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, नाताळच्या सुटीनंतर शुक्रवारी (दि. २६) ५९० इच्छुक उमेदवारांनी एकूण १,१४८ नामनिर्देशनपत्रांची खरेदी केली. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आता अवघे तीन दिवस उरले असून, रविवार (दि. २८) सुटीचा दिवस आहे, तर मंगळवार (दि. ३०) हा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २७) शहरातील सहा विभागीय कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्जविक्रीच्या आकडेवारीनुसार पहिल्या दिवशी १,७६३, दुसऱ्या दिवशी १,९४२ आणि तिसऱ्या दिवशी १,१४८ अशी एकूण तीन दिवसांत ४,८५३ नामनिर्देशनपत्रांची विक्रमी विक्री नोंदविण्यात आली आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

