नाशिक। दि. २२ डिसेंबर २०२५: इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनाधिकृत रित्या बिनशेती प्रयोजन, अनाधिकृत रित्या वापरात बदल, अनधिकृतरित्या बदल करून इमारतीचा हॉटेल/ रिसोर्ट/ टूरिस्ट होम/ लॉजिंग व रेस्टॉरंट व्यावसायिक अतिथ्य यासाठी अवैध वापर आदी तपासणीसाठी 19 डिसेंबर 2025 पासून ऑपरेशन व्ही अंतर्गत नियुक्त तपासणी पथकाद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
ही मोहीम जानेवारी 2026 पर्यंत राबविण्यात येणार असल्याचे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी इगतपुरी- त्र्यंबकेश्वर उपविभाग नाशिक डॉ. जी. वी. एस. पवन दत्ता यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 12 खासगी रहिवाशी इमारतीची तपासणी करण्यात आली असून प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आलेल्या मिळकती धारकांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. इमारतींचा अवैध व बेकायदेशीर वापर सुरू असल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यास अशा मिळकती धारकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही उपविभागीय दंडाधिकारी श्री. पवन दत्ता यांनी कळविले आहे.
![]()

