नाशिक। दि. १९ डिसेंबर २०२५: महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटीच्या वतीने फ्लोमिटर बसवणे आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देखभाल-दुरुस्तीसाठी शनिवारी (दि. २०) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर रविवारीही कमी दाबाने पाणी येईल.
स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन फ्लोमिटर आणि व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहेत. प्रामुख्याने अमृतमणी जलकुंभ, दत्तनगर टाकी आणि चुंचाळे पंपिंग स्टेशन येथे हे कामे होणार असल्याचे महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.
या विभागात होणार दुरुस्तीची कामे:
नाशिक पूर्व: द्वारका, गोडेबाबा जलकुंभवाहिनी, सुचित्ता नगर व गांधीनगर जलकुंभावर दुरुस्ती.
नाशिकरोड: मुक्तिधाम जलकुंभाची ३०० मी.मी. पाईपलाईन गळती दुरुस्ती, दुर्गा जलकुंभ येथे फ्लोमिटर बसवणे.
पंचवटी मखमलाबाद उर्ध्ववाहिनी क्रॉस कनेक्शन, नवीन १५ लक्ष लिटर जलकुंभ मुख्य वाहिनीशी जोडणे.
सातपूर: अंबड लिंकरोड, चुंचाळे, ध्रुवनगर येथील जलवाहिन्यांची गळती काढणे.
सिडको: ९०० मी. मी. व्यास मुख्य वाहिनीची गळती देखभाल व दुरुस्ती, अंबड इएसआर व्हॉल्व रिपेरिंग.
विभागनिहाय नियोजन:
शहरातील विविध ठिकाणच्या जलवाहीन्यांच्या दुरुस्तीकामासाठी नियोजन करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी आणि पालिकेकडून हे काम २४ तास चालणार असून यात मोठ्या प्रमाणातील कामे स्मार्ट सिटीची आहेत. त्यामुळे शनिवारी पाणी पुरवठा बंद राहील तर रविवारीही काही ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणीसाठा करुन ठेवावा – संजय आडेसरा, कार्यकारी अभियंता, महापालिका
![]()

