🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक व मालेगाव शहरात कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन कार्यान्वित; दररोज शंभर नागरकिांची होणार मोफत तपासणी

नाशिक। दि. १० डिसेंबर २०२५: जिल्हा रूग्णालयामार्फत नागरकिांना मोफत कर्करोग निदान सेवेचा लाभ मिळण्याासठी नाशिक व मालेगाव शहरात कॅन्सन डायग्नोस्टीक व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ रूग्ण व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारूदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, माता ब बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते, नाशिक मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देवकर व मालेगाव मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवन वृक्षतोड प्रकरणी १७ फेब्रुवारीला सुनावणी, मनपाने लेखी हमी देण्याची मागणी

या व्हॅनच्या माध्यमातून मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख (सर्व्हिक्स) कर्करोग यांची तपासणी, स्क्रिनिंग तसेच आवश्यकतेनुसार प्राथमिक उपचार सुविधा दिली जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ दंतशल्य चिकित्सक व स्त्रीरोग तज्ज्ञ व्हॅनमध्ये नियुक्त केले असून संशयित रूग्णांसाठी बायोप्सीची सुविधा उपलब्ध असणार आहे. ही व्हॅन दररोज ठराविक ठिकाणी थांबून मोफत कर्करोगाची तपासणी करणार आहे. स्थानिक महानगरपालिका, प्रभाग अधिकारी, आशा व ए एन एम कर्मचारी यांच्या माध्यमातून नागरिकांना तपासणी वेळापत्रकाची माहिती उपलब्ध होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोण होणार महापौर ? दिपाली गीतेंच्या नावाची जोरदार चर्चा !

असे आहे व्हॅनचे वेळापत्रक:
15 डिसेंबर 2025 पर्यत –
नाशिक शहरातील विविध प्रभागात दौरा
16 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 – मालेगाव शहरातील विविध भागांमध्ये दौरा

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790