NMRDA च्या पहिल्या दोन औद्योगिक नगर रचना योजनांचे मोजणीचे काम अंतिम टप्प्यात

नाशिक। दि. ९ डिसेंबर २०२५: नाशिक महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणामार्फत सिन्नर तालुक्यातील मौजे मोह व चिंचोली येथे औद्योगिक नगर रचना योजना प्रस्तावित आहेत. या नगर रचना योजनांना 16-21 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासनाच्या राजपत्रान्वये प्रारूप नगररचना योजना मौजे चिंचोली, तालुका सिन्नर क्रमांक 1 व 2 (औद्योगिक प्रयोजनार्थ) मंजुरी प्राप्त झाली आहे. या औद्योगिक नगर रचना योजनांमुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणारअसल्याचे महानगर आयुक्त जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

आयुक्त श्री. शर्मा यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी समवेत महानगर नियोजनकार जयश्रीराणी सुर्वे, उपमहानगर अभियंता शरद साळुंखे, उपमहानगर नियोजनकार अथर्व खैरनार, सहाय्यक नियोजनकार शिवानी वामन व योजनेतील भूधारक उपस्थित होते.

प्रत्यक्ष जागेवर भूमी अभिलेख विभागामार्फत अंतिम भूखंडाची व रस्त्यांच्या मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून जागेवर अंतर्गत रस्ते, विजेचे खांब, भूमिगत गटारी , पाण्याची व्यवस्था इत्यादी कामे प्रगतीपथावर आहेत. योजनांमुळे पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती, आर्थिक विकासाला चालना इत्यादी लाभ समाविष्ट भूधारकांना मिळणार असून या योजनांमुळे परिसरातीसह औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे आयुक्त श्री शर्मा यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790