नाशिक। दि. ९ डिसेंबर २०२५: इंडिगोच्या संचालनात सुरू असलेला तांत्रिक व मनुष्यबळाचा गोंधळ अद्याप पूर्णपणे मार्गी लागलेला नसल्याने ८ ते ११ डिसेंबर दरम्यान नाशिक–दिल्ली सायंकाळची फ्लाइट रद्द करण्याचा निर्णय कंपनीने जाहीर केला आहे. इंडिगोने याबाबत अधिकृत सूचना जारी केली आहे.
केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) पायलट व विमान कर्मचारी यांच्या कामकाजाच्या वेळेचे नवे नियम लागू केले आहेत. या अंमलबजावणीदरम्यान अपुरा कर्मचारीवर्ग, तसेच बदलत्या हवामानाचा परिणाम इंडिगोच्या उड्डाणांवर झाला. कंपनीकडून परिस्थिती सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून दोन दिवसांत काही प्रमाणात सेवेत सुधारणा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र सर्व उड्डाणे नियमानुसार सुरू ठेवण्यासाठी सायंकाळची दिल्ली–नाशिक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, सकाळची नाशिक–दिल्ली विमानसेवा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहणार असल्याचे इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
![]()

