
नाशिक। दि. १२ नोव्हेंबर २०२५: अपोलो हॉस्पिटल्स नाशिक यांच्या वतीने व उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर यांच्या सहयोगाने जन्मजात हृदय विकार तपासणी शिबिराचे आयोजन अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक येथे करण्यात आले. या उपक्रमामध्ये ३० हून अधिक बालकांनी पालकांसह सहभाग घेतला व आवश्यक तपासण्या करून घेतल्या.
या पुढील उपचारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग, बाल स्वास्थ तसेच मुख्यमंत्री सहायता विभाग यांच्या माध्यमातून उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून योजले असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. निर्मल कोलते, डॉ भूषण टिळे व डॉ अभयसिंह वालिया डॉ अजहर सैय्यद यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी डॉक्टरांनी जन्मजात हृदयरोगाच्या लवकर निदानाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की बालकांच्या शारीरिक वाढीत कमीपण, त्वचेचा रंग बदलणे, बाळाला दम लागत आहे असे जाणवणे अशा लक्षणे जाणवल्यास तपासणी करणे आवश्यक ठरते आधुनिक तंत्रज्ञान व प्रगत उपचार पद्धतींमुळे अशा बालकांचे जीवनमान पूर्णतः बदलू शकते व निरोगी आयुष्य सहज शक्य आहे
अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचे सीईओ श्री. अजीत झा यांनी पालकांना आवाहन करत सांगितले की, “अपोलो हॉस्पिटल्सकडे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुविधांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा व आपल्या बालकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.”
कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचे मार्केटिंग हेड श्री. देवेंद्र वाघ यांनी केले. या वेळी डॉ भूपेश पराते, डॉ. अभिषेक मोघे, राहुल दामोदर, अंकित कुमार, अली सैय्यद, कैवल्य सोहनी, माणिक घोरपडे तसेच अपोलो हॉस्पिटल्स टीम उपस्थित होती.
![]()
