नाशिक: मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत अशासकीय पदभरतीसाठी 19 नोव्हेंबरला मुलाखत

नाशिक। दि. १२ नोव्हेंबर २०२५: मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शारीरिक प्रशिक्षण निदेशक (महिला) 1 पद, शिपाई 1 पद, पहारेकरी 1 पद, ग्राऊंडसमन 1 पद अशी पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमदेवारांनी 19 नोव्हेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी मुलींची सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था, सैनिकी मुलांचे वसतिगृह, पत्रकार कॉलनी, त्र्यंबक रोड, शासकीय डेअरी समोर, नाशिक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे संचालक कर्नल (निवृत्त) मकरंद देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रलंबित गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने पूर्ण करावा- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

शारीरिक प्रशिक्षण निदेशक (महिला) पदासाठी उमदेवार पदवी/ पदवीधर असावा. शारीरिक शिक्षणामध्ये पदवी व वसतिगृहात राहण्यास इच्छुक असल्यास प्राधान्य असणार आहे. शिपाई व पहारेकरी पदासाठी शैक्षणिक पात्रता इयता 10 वी उत्तीर्ण अशी असून माजी सैनिक असल्यास प्राधान्य असणार आहे. ग्राउंडसमन पदासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असून खेळाच्या मैदानाची देखभाल व रखरखाव ठेवणे इत्यादी कामाचा अनुभव आवश्यक आहे. अधिक माहितसाठी मोबाईल क्रमांक 9703548457 व 9421004794 वर संपर्क साधावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here