नाशिक। दि. ८ नोव्हेंबर २०२५: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी व त्रिभाषा सूत्र राज्यात कोणत्या इयत्तेपासून सुरू करावयाचे याबाबत धोरण निश्चितीसाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
ही समिती मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रोजी कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह,के.टी.एच.एम महाविद्यालयाच्या शेजारी, गंगापुर रोड येथे समिती नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी उपस्थित राहील. यासाठी जिल्ह्यातील नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संलग्न संबंधित शासकीय, अशासकीय संस्थाचे अध्यक्ष, सदस्य, लोकप्रतिनिधी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना, पालक, शिक्षण संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, संस्था प्रतिनिधी यांनी नियोजित स्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद, नाशिकचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या समितीतअध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ डॉ. जाधव यांच्यासह माजी भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ. वामन केंद्रे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अर्पणा मॉरिस,डेक्कन कॉलेज पुणेच्या भाषा विज्ञान प्रमुख सोनल कुलकर्णी-जोशी, छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण तज्ज्ञ डॉ. मयुश्री सावजी, बाल मानसतज्ज्ञ, पुणे डॉ.भूषण शुक्ल हे सदस्य आहेत. राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान मुंबईचे संजय यादव हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
नागरिकांसाठी आपली मते/ विचार व्यक्त करण्यासाठी समितीच्या https://tribhashasamiti.mahait.org या संकेस्थळावर व्यवस्था करण्यात आली आहे.
![]()
